मुंबईच्या आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्रात विविध पदांची भरती

CCRAS Recruitment 2022: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद, मुंबई (Central Council of Ayurvedic Science Revision, CCRAS) अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत सिनिअर रिसर्च असिस्टंट (Senior Research Assistant)आणि ऑफिस असिस्टंट (Office Assistant) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी २० आणि २१ जानेवारी २०२२ रोजी मुलाखती होणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीला येताना स्वखर्चाने राहावे लागणार आहे. सिनिअर रिसर्च असिस्टंट पदाच्या ५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीएएमएसमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ रोजी ३५ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगनानुसार ३५ हजार रुपये पगार मिळणार आहे. ऑफिस असिस्टंट पदाच्या २ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवार हा सेंट्रल गव्हर्मेंटमधून निवृत्त असावा. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ रोजी ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. निवड झालेल्या उमेदवाराला ३० हजार रुपये पगार दिला जाईल. इतर कोणताही भत्ता दिला जाणार नाही. सिनिअर रिसर्च असिस्टंट आणि ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवारांनी RRA पोदार, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, वरळी, मुंबई या पत्त्यावर दिलेल्या तारखेला सकाळी १० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीला येण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच मुळ कागदपत्र, अनुभव प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, स्वसाक्षांकित मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रति घेऊन उपस्थित राहावे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला असून बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eFmxyP
via IFTTT

Post a Comment

0 Comments