Also visit www.atgnews.com
coronavirus : शाळांमध्ये फुटतोय करोना बॉम्ब! अनेक राज्यांनी उचलले मोठे पाऊल
नवी दिल्ली : करोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढताना ( ) दिसत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये प्रत्येक दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या दुप्पट होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीर अनेक राज्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी घोषित करत शाळां बंद केल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा बंद करण्याबाबत विचार सुरू आहे. दिल्लीत शाळा बंद ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्ली सरकारने २८ डिसेंबरला GRAP (ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लॅन) लागू केला आहे. यामुळे दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांसह कोचिंक इन्स्टिट्यूटही बंद करण्यात आले आहेत. यूपीत १५ दिवस शाळा बंद थंडीची लाट आणि थंडीचा वाढता कडाका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने ८ वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य शिक्षण विभागाने पहिल्यांदाच थंडीची सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांना सुट्टी दिली जात होती. दिल्ली-एनसीआरमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता यूपी सरकारने नोएडा, ग्रेटर नोएडा, हापूड आणि गाझियाबादमधील ८ वी पर्यंतच्या सरकारी शाळा १५ दिवसांसाठी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पाटणामध्ये ८ जानेवारीपर्यंत शाळाबंद थंडीमुळे पाटणामध्येही ८ पर्यंत शाळा बंद राहणार आहे. ८ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी दिले आहेत. हा आदेश सर्व सरकारी आणि खासगी शाळांना लागू असेल. मुंबईत ३१ जानेवारीपर्यंत ९वी पर्यंत शाळा बंद मुंबईत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याने आणि त्याच करोनाच्या इतर वेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याने महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. फक्त मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातही करोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबई लहान मुलांना करोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता महापालिकेने ३१ जानेवारीपर्यंत १ ते ९ वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तराखंडमध्ये शाळेत फुटला करोना बॉम्ब, ८३ विद्यार्थी पॉझिटिव्ह नैनितामधील जवाहर नवोदय विद्यालयात ७९ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक आणि एक मॅट्रनला करोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. तसंच इतर विद्यार्थ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. शाळेत एकूण ५३० विद्यार्थी आहेत. चाचणीत जे विद्यार्थी निगेटिव्ह आढळून आले आहेत, त्यांना घरी पाठवलं जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ३० डिसेंबरला १० विद्यार्थी आणि शाळेच्या प्राचार्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर ४८८ विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ९३ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आलेत. तसंच काही विद्यार्थ्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, असे शाळा प्रशासनाने सांगितले. पश्चिम बंगालमध्ये शैक्षणिक संस्था बंद पश्चिम बंगालमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील सर्व शैक्षणिक हालचाली बंद राहणार आहेत. तसंच कार्यलयांमध्ये एकावेळी फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला मंजुरी देण्यात आली आहे. तामिळनाडूत १० जानेवापर्यीत शाळा बंद तामिळनाडूत १ ते ८ वीपर्यंतचे वर्ग १० जानेवारी २०२२ पर्यंत बंद राहणार आहे. ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. ओडिशात शाळा बंदच ओडिशात आजपासून शाळा सुरू करण्यात येणार होत्या. पण १ ते ५वीपर्यंच्या सर्व शाळा सुरू करण्याच्या निर्णय स्थगित करण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आलंय. राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमधील शाळा, महाविद्यालये बंद करोना संसर्गाचा वाढता धोका पाहता झारखंडमधील शाळा, महाविद्यालयेही बंद राहणार आहेत. झारखंड सरकार राज्यात लवकरच नाइट कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळेही बंद होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील शाळा बंद राजस्थानमध्ये जयपूरमधील सरकारी आणि खासगी शाळांमधील १ ते ८ चे वर्ग ३ ते ९ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. इतर जिल्हाधिकारीही शिक्षण विभागाशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत. हरयाणात १२ जानेवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद हरयाणात शाळा, महाविद्यालये २ जानेवारीपासून बंद करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, आयटीआय, कोचिंग क्लासेस, ग्रंथालय आणि प्रशिक्षण संस्था बंद राहतील, असे आदेशात म्हटले आहे. १२ जानेवारीनंतर शाळा, कॉलेजेस सुरू होण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HA2rCM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments