Also visit www.atgnews.com
CSIR नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा डाऊनलोड
CSIR 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. सीएसआयआर नेट परीक्षा २९ जानेवारी आणि १५ ते १७ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे. उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्मतारीख भरुन सीएसआयर नेट २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. सीएसआयर यूजीसी नेट २०२२ (CSIR UGC NET 2022) परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परीक्षेवेळी प्रवेशपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच परीक्षा केंद्रावर जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागेल. करोना निर्देशांचे पालन करुन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षार्थींना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर करोना निर्देशांचे पालन करावे लागेल. प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट csirnet.nta.nic वर जा. 'Combined CSIR-NET जूनसाठी प्रवेशपत्र डाउनलोड कराट या लिंकवर क्लिक करा. त्याच्या शेजारी बॉक्ससह एक नवीन पेज उघडेल. दिलेल्या बॉक्समध्ये CSIR NET 2022 अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखी क्रेडेन्शियल्स एंटर करा. UGC NET 2022 उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी सीएसआयआर यूजीसी नेट २०२२ प्रवेशपत्र डाऊनलोड करा. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ज्युनियर फेलोशिप (JRF) आणि लेक्चरशिप/असिस्टंट प्रोफेसरसाठी उमेदवारांची राष्ट्रीय स्तरावरील पात्रता निश्चित करण्यासाठी सीएसआयआर परीक्षा २०२२ घेतली जाते. विज्ञान शाखेत मास्टर डिग्री असलेल्यांना सीएसआयआर नेट परीक्षा देता येते. यात सीबीटी माध्यमातून २ पेपर असून वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्न विचारले जातात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3g3epsA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments