बुलडाण्यात खळबळ; शाळा सुरू होण्यापूर्वीच २२ शिक्षकांना एकाचवेळी करोनाची लागण

बुलडाणाः राज्यात करोना संसर्गाचा कहर अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळं राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. तसंच, करोना संसर्ग पाहता शाळा देखील ऑनलाइन घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार शाळा पुन्हा सुरु करण्याचे होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यापूर्वीच बुलडाणा जिल्ह्यातील एका शाळेत २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. एकाच शाळेतील २२ शिक्षकांना करोनाची लागण झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील अरजण खिमजी शाळेतील २२ जणांना एकाच वेळी करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांचेही टेन्शन वाढलं आहे. एकाच वेळी २२ जणांना करोनाची लागण झाल्यामुळं शाळा प्रशासनाच्याही चिंतेत वाढ झाली आहे. या २२ शिक्षकांबरोबरच आणखी कोणाला करोनाची बाधा झालीये का हे तपासण्यासाठी शाळेतील इतर कर्मचाऱ्यांचीही करोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळं एकूण ११३ शिक्षक कर्मचाऱ्यांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. वाचाः बुलडाणा जिल्ह्यातील ही मोठी शाळा असून या शाळेत १ ते १२वी पर्यंतचे एकून ५ हजार ५०० विध्यार्थी आहेत. तर १५० शिक्षक आहेत. उद्यापासून म्हणजे २८ जानेवारीपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करोनाचे नियम पाळून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिक्षकांना शाळा सुरू होण्याआधी करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. म्हणून या शाळेतील १५० शिक्षकांपैकी सुरुवातीला पहिल्या टप्प्यात ३५ शिक्षकांनी RTPCR चाचणी केली असता ३५ पैकी २२ शिक्षक करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झाल्याने अजून ११३ शिक्षकांचा करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे उद्यापासून शाळा कशा सुरू कारायच्यात असा प्रश्न उपस्थित झाला आहे? एकाच शाळेत जर इतके शिक्षक करोनाबाधित असतील तर मुलांच्या सुरक्षेचं काय? असाही प्रश्न पालकांना पडला आहे. वाचाः


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32zc5Xc
via IFTTT

Post a Comment

0 Comments