Also visit www.atgnews.com
IBPS पीओ, क्लर्क परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर
IBPS PO, Clerk Result 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल बँकिंग (IBPS) प्रादेशिक ग्रामीण बँक (RRB) आणि प्रोबेशनरी ऑफिसर (PO) परीक्षा २०२१ चे अंतिम जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- ibps.in वर जाऊन निकाल तपासू शकतात. निकाल पाहण्याची ऑनलाइन लिंक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत सक्रिय असणार आहे. आरआरबी ऑफिसर स्केल १ Officers Scale-I म्हणजेच पीओ पदाच्या भरतीसाठी ८ जून २०२१ रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २८ जून २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती. या रिक्त जागांसाठी ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. त्याचे निकाल (IBPS RRB PO Result 2021) अधिकृत वेबसाइट- ibps.in वर जाहीर करण्यात आले आहेत. असा पाहा निकाल निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. होमपेजवरील Recruitment सेक्शनवर क्लिक करा. आता Common Recruitment Process for RRBs (CRP-RRBs-X) for Recruitment of Group “B” – Office Assistants (Multipurpose) किंवा Common Recruitment Process for RRBs (CRP-RRBs-X) for Recruitment of Group A – Officers (Scale-I) या लिंकवर क्लिक करा. येथे निकालावर क्लिक करा. पुढच्या पेजवर लॉगिन करा. रोल नंबर आणि नावाच्या मदतीने निकाल तपासा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा पीओ पदाच्या रिक्त जागा RRB द्वारे जाहीर केलेल्या या रिक्त पदांनुसार, RRB ऑफिसर स्केल १ च्या एकूण ३८७६ पदांची भरती केली जाईल. सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी १६६६ जागा, EWS प्रवर्गासाठी ३८७ जागा, ओबीसी उमेदवारांसाठी ११०० जागा, एससी प्रवर्गासाठी ४२० आणि एसटी प्रवर्गासाठी ३०३ जागा भरल्या जात आहेत. या पदांवर भरती या रिक्त पदांमधून एकूण १० हजार २९३ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये अधिकारी सहाय्यक (लिपिक) ५१३४ पदे, अधिकारी स्केल-I (PO) ची ३८७६ पदे, अधिकारी स्केल II सामान्य बँकिंग अधिकारी ९०५ पदे, अधिकारी स्केल II माहिती तंत्रज्ञान अधिकारी ५८ पदे भरण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त ऑफिसर स्केल II चार्टर्ड अकाउंटंटची ३० पदे, ऑफिसर स्केल II लिगल ऑफिसर - २७ पदे, ट्रेझरी ऑफिसर स्केल II - ९ पदे, मार्केटिंग ऑफिसर स्केल II - ४३ पदे, कृषी अधिकारी स्केल II - ३४ पदे आणि ऑफिसर स्केल III - १७७ पदांचा समावेश आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eP8nes
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments