Also visit www.atgnews.com
IGNOU मध्ये यूजी, पीजी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाचे निर्देश
Course: इग्नूतर्फे जूलै २०२१ सत्राला प्रवेश घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. इग्नुतर्फे यूजी आणि पीजी अभ्यासक्रमाच्या अर्ज प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आधीच्या मुदतवाढीनुसार उमेदवारांना अधिकृत वेबसाइट gnou.ac.in वर जाऊन ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अर्ज करता येणार होता. नव्या अपडेटनुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्रूच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, टर्म एंड एक्झामिनेशन (TEE) साठी प्रोजेक्ट, प्रबंध, फील्डवर्क जर्नल, इंटर्नशिप अहवाल ऑनलाइन सबमिट करण्याची अंतिम मुदत देखील वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांची असाइनमेंट सबमिट करता येणार होती. अशी करा नोंदणी IGNOU पुनर्नोंदणी फॉर्म २०२२ भरण्यासाठी, सर्वप्रथम IGNOU ची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. 'IGNOU Re-Registration' टॅबवर क्लिक करा. 'इग्नू पुनरनोंदणीसाठी पुढे जा' या लिंकवर क्लिक करा. लॉगिन तपशील भरा. इग्नू पुनरनोंदणी फॉर्म भरा. कोर्सच्या यादीमधून अभ्यासक्रम निवडा. आवश्यक तपशील भरा आणि 'नेक्स्ट' बटणावर क्लिक करा. IGNOU पुनरनोंदणी २०२२ शुल्क भरा. नोव्हेंबरपासून नोंदणीची प्रक्रिया IGNOU ने जानेवारी २०२२ सत्रासाठी नोंदणीची प्रक्रिया २ नोव्हेंबरपासून सुरु केली होती. विद्यापीठाद्वारे ऑफर केलेल्या कोणत्याही पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. विद्यापीठाने जानेवारी २०२२ सत्रासाठी नवीन प्रवेश सुरू केले आहेत. दरम्यान, विद्यापीठाने टीईई डिसेंबर २०२१ (TEE December 2021) साठी तात्पुरत्या परीक्षेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार, परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. सकाळची शिफ्ट सकाळी १० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजेपर्यंत संपेल तर दुपारची शिफ्ट दुपारी २ ते ५ दरम्यान असेल. डिप्लोमा/पदव्युत्तर डिप्लोमाचे प्रवेश बंद झाले आहेत. त्यासाठी ही मुदतवाढ नसणार आहे. केवळ यूजी आणि पीजी कोर्सेसच्या अर्ज प्रक्रियेलाच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती इग्नूतर्फे देण्यात आली आहे. त्यानुसार यूजी आणि पीजी कोर्सच्या प्रवेशासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नूने यावर्षी अनेकवेळा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/342Q2sk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments