Also visit www.atgnews.com
Health Department Exam Paper Leak: पेपर फुटीप्रकरणी आणखी एकाला अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे आरोग्य भरतीच्या गट 'क'च्या पेपर फुटीप्रकरणात पेपर पुरविणाऱ्या एका व्यक्तीला सायबर सेलने दिल्ली येथून अटक केली आहे. त्यामुळे गट 'क'च्या पेपर फुटीप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. आशुतोष श्रीवेदप्रीय शर्मा (वय ३८, रा. सेक्टर दोन, दिल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात पूर्वी निशीद गायकवाड व राहुल लिंघोट यांना अटक केली आहे. या दोघांना शर्मा यानेच आरोग्य विभागाचा गट 'क'चा पेपर पुरविल्याचे समोर आल्यानंतर त्याला दिल्लीतून अटक केली असल्याची माहिती सायबर सेल पोलिसांनी दिली. आरोग्य भरतीच्या गट 'ड'चा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर सेल पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार मुंबई आरोग्य विभागाच्या कार्यालयाचे संचालक डॉ. महेश बोटले, आरोग्य विभागाच्या लातूर कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे, आंबेजोगाईतील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगदंड यांच्यासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. या वेळी केलेल्या तपासामध्ये गट 'क'चा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर सेल पोलिसांनी स्वतंत्र गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. यामध्ये परीक्षा घेणाऱ्या 'न्यासा' कंपनीसह परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या साखळीत शर्मा हा मधला आरोपी आहे. त्याने एजंटला पेपर पुरविण्याचे काम केल्याचे तपासात समोर आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/340R9J1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments