Also visit www.atgnews.com
IIT खरगपूरतर्फे GATE परीक्षा प्रवेशपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट
GATE 2022: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) म्हणजेच गेट परीक्षेचे प्रवेशपत्र आज म्हणजेच १५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या परीक्षेला नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3lvpgQ3 वी प्रवेशपत्रे आजपासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी () खरगपूरच्या वेळापत्रकानुसार, आधी हे प्रवेशपत्र ३ जानेवारी होते. पण नंतर याला ७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आज १५ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. करोना प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉनची झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता परीक्षा स्थगित करा अशी मागणी करण्यात आली. पण आता परीक्षेला मुदतवाढ देण्यात येणार नाही असे संस्थेने स्पष्ट केले आहे. Admit Card: असे करा डाऊनलोड गेट प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- gate.iitkgp.ac.in वर जा. त्यानंतर होमपेजवरील Login वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा नावनोंदणी क्रमांक/ईमेल आयडी आणि पासवर्ड भरा. कॅप्चा भरा आणि नंतर तुमचे प्रवेशपत्र पाहण्यासाठी पुढे जा. त्यानंतर प्रवेशपत्रावरील तुमचा तपशील (नाव, परीक्षा केंद्र इ.) तपासा. तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढून ठेवा. प्रवेशपत्रावर उमेदवाराचे नाव, नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, फोटो आणि सही, पेपर कोड, परीक्षा केंद्र कोड, परीक्षा केंद्राचे नाव आणि पत्ता, परीक्षेची तारीख आणि दिवस, परीक्षेची वेळ आणि परीक्षेसंबंधित महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. गेट २०२२ ची परीक्षा ५ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता फारच कमी आहे. परीक्षा आयोजित करणारे अधिकारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत अशी माहिती आयआयटी खरगपूर संस्थेतर्फे देण्यात आली आहे. उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र घेऊन येणे अनिवार्य आहे. यासोबतच उमेदवाराने एक ओळखपत्र देखील सोबत बाळगणे आवश्यक आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्या. उमेदवारांनी त्यांच्या पेपरशी संबंधित माहिती, पेपरच्या तारखा आणि इतर माहिती नीट तपासून घ्यावी. ते मागील वर्षांच्या नमुना पेपरमधून गेट परीक्षा २०२२ ची तयारी देखील करू शकतात. १२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पहिल्या सत्रात CE-1, BT, PH आणि EY पेपर होणार आहे. यानंतर दुपारी २.३० ते ५.३० ला दुसऱ्या शिफ्टमध्ये CE-2, XE आणि XL चे पेपर होणार आहेत. वेळापत्रकाच्या शेवटच्या दिवशी १३ फेब्रुवारीला सकाळच्या शिफ्टमध्ये ME-1, PE आणि AR चे पेपर आणि दुपारच्या शिफ्टमध्ये ME-2, GE आणि AE होणार आहे. गेट प्रवेशपत्र २०२२ संबंधित महत्त्वाच्या तारखा गेट २०२२ प्रवेशपत्र जाहीर करण्याची तारीख - १५ जानेवारी २०२२ गेट २०२२ परीक्षेची तारीख - ५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ गेट २०२२ चा निकाल जाहीर करण्याची तारीख - १७ मार्च २०२२ गेट प्रवेशपत्र २०२२ मध्ये काही चूक आढळल्यास त्वरित कार्यालयाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्रातील चूक दुरुस्त करण्यासाठी गेट परीक्षा आयोजित करणार्या संस्थेकडे प्रतीसह (ईमेलद्वारे) विभागीय गेट २०२२ कार्यालयाशी संपर्क साधावा. ईमेलच्या विषयामध्ये ओळीत 'अॅडमिट कार्ड करेक्शन' असे लिहावे. उमेदवारांनी प्रवेशपत्रावर योग्य माहिती भरावी. ज्यामुळे त्यांना अचूक प्रवेशपत्र मिळू शकेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tzMb0R
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments