Also visit www.atgnews.com
IIT Kharagpur मध्ये ६० जण करोना पॉझिटिव्ह, दीड वर्षानंतर सुरु झालेले ऑफलाइन वर्ग १५ दिवसांत बंद
IIT Kharagpur: देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत. ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची रुग्णसंख्याही सातत्याने वाढत आहेत. आयआयटी खरगपूर कॅम्पसमध्ये ४० विद्यार्थी आणि रिसर्चरसह ६० जण करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. बहुतेक करोना संक्रमित लोक लक्षणे नसलेले आहेत. करोना पॉझिटीव्ह आढळलेल्या सर्व लोकांना होमआयसोलेशनमध्ये किंवा संस्थेच्या वसतिगृहात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आयआयटी खरगपूरचे रजिस्ट्रार तमलनाथ यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात विद्यार्थी-रिसर्चर यांच्याव्यतिरिक्त, इतर २० शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापक करोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. कॅम्पसमधील रुग्णालय संक्रमित रुग्णांच्या स्थितीवर लक्ष ठेवून असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तमलनाथ म्हणाले. विद्यार्थी आणि रिसर्चर यांच्या कुटुंबातील सदस्यांना तापासारखी लक्षणे असल्यास त्यांनी करोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून ते आमच्या सल्ल्याचे पालन करत असल्याचे आयआयटी खरगपूरने केले आहे. अशाप्रकारच्या तपासणी दरम्यान एकूण ४० करोनाबाधित आढळले. करोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्याने आपल्यालाही अशा प्रकारची काळजी घेणे गरजेचे असल्याचे तमलनाथ यांनी सांगितले. महाविद्यालयांविषयी अपडेट वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर (Corona) राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या प्रमुख शहरांमधील शाळा (Schools in Maharashtra) जानेवारी अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला मात्र राज्यातली याबाबत विद्यार्थी, पालकांच्या मनात संभ्रम आहे. मात्र महाविद्यालयांबाबतचा निर्णय बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. आज सर्व विभागीय आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत बैठक ऑनलाइन पार पडली. कोविड १९ बाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षिततेबद्दल चर्चा झाली. या संदर्भात निर्णय उद्या सायंकाळी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3JFQ5e1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments