IIT Madras : आयआयटी मद्रासमध्ये मोबाइल नेटवर्कवर नवा अभ्यासक्रम

: भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) मद्रास प्रवर्तक टेक्नोलॉजीज फाउंडेशन आणि मेगम सोल्युशन्स संयुक्तरित्या 'नेक्स्ट जनरेशन मोबाइल वायरलेस नेटवर्क्स' वर सहा महिन्यांचा ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स सुरू करत आहेत. या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ८ फेब्रुवारी २०२२ आहे आणि याचे सत्र १२ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. सत्राचे आयोजन अल्टरनेट विकेंडला केले जाईल. इच्छुक आणि योग्य उमेदवारांना या कोर्सचे रजिस्ट्रेशन आणि अधिक माहिती संस्थेच्या संकेतस्थळावरून मिळू शकेल. अभ्यासक्रमाच्या रजिस्ट्रेशनसाठी या लिंकवर क्लिक करा. आयआयटी (IIT) मद्रासने म्हटले आहे की या अभ्यासक्रमात 5G, सॉफ्टवेयर डिफाइंड नेटवर्क, नेटवर्क फंक्शन वर्च्युअलायझेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) यासारख्या तंत्रांचे ज्ञान आणि व्यावहारिक अनुभवाचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना नेक्स्ट जनरेशन मोबाइल वायरलेस नेटवर्क, नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर घटक, प्रोटोकॉल आणि आधुनिक मोबाइल वायरलेस नेटवर्क साठी विविध अॅप्लिकेशन्सचे ज्ञान मिळेल. इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्समध्ये एमएससी डिग्री आणि पीएचडी स्कॉलर, फॅकल्टी मेंबर आणि प्रोफेशनल या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात. आयआयटी मद्रासचे संचालक प्रोफेसर वी कामकोटी म्हणाले, 'हा अभ्यासक्रम खूप योग्य वेळी सुरू केला आहे. या कौशल्याद्वारे नजीकच्या भविष्यात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची आशा आहे.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IjARd8
via IFTTT

Post a Comment

0 Comments