IOCL Recruitment: इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये (Indian Oil Corporation) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पदभरती अंतर्गत टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) आणि ट्रेड अप्रेंटिसची (Trade Apprentice) एकूण ५७० पदे भरली जाणार आहेत. यातील महाराष्ट्रातून ३२२ पदे भरली जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे ५० टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित विषयात आयटीआय/एनसीव्हीटी/एससीव्हीटी (ITI/ NCVT/ SCVT)असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा ३१ जानेवारी २०२२ पर्यंत उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण आणि २४ वर्षांपर्यंत असावे. निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेतून होणार आहे. यामध्ये १०० गुणांचे ऑब्जेक्टीव्ह प्रश्न विचारले जातील. यासाठी ९० मिनिटांचा वेळ दिला जाईल. प्रश्न हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असतील. यामध्ये उमेदवारांना ४० टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. मागासवर्गीय उमेदवरांसाठी ३५ टक्के गुण आवश्यक आहेत. निवड झालेल्या उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी १५ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rnTnKG
via IFTTT

Post a Comment

0 Comments