MH SET Result 2021: राज्य पात्रता परीक्षेचा निकाल ६.६४ टक्के

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (MH ) निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पाच हजार २९७ उमदेवार उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्‍केवारी ६.६४ इतकी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा २६ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा राज्यात घेण्यात आली होती. या परीक्षेला ७९ हजार ७७४ उमदेवार बसले होते. त्यापैकी पाच हजार २९७ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला अर्ज केलेल्यांपैकी ८१ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. यापूर्वी २७ डिसेंबर २०२०मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा ६.७३ टक्‍के लागला होता. यंदाचा सेटचा निकाल ६.६४ टक्‍के इतका लागला आहे, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे. निकाल विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांना सेटचे प्रमाणपत्र चार फेब्रुवारीपासून ऑनलाइन उपलब्ध होतील. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रमाणपत्र यंदाही ऑनलाइन प्राप्त होतील, अशी माहिती सेट विभागाकडून देण्यात आली आहे. कसा पाहाल MH 2021? पुढील स्टेप बाय स्टेप पद्धतीने निकाल डाऊनलोड करता येईल. - पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेची अधिकृत वेबसाइट येथे जा. - होमपेजवरील निकालाच्या टॅबवर क्लिक करा. - आता परीक्षेची तारीख आणि विचारलेली माहिती भरा. - आता स्क्रीनवर तुमचा निकाल दिसू लागेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊट घेऊन ठेवा. MH-SET परीक्षा एकूण ३२ विषयांसाठी आयोजित केली जाते. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3KU5EiM
via IFTTT

Post a Comment

0 Comments