Also visit www.atgnews.com
SSC HSC Practical Exam: अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षा
म. टा. प्रतिनिधी, पुणे दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी ( 2022) बाह्यपरीक्षक न बोलावता अंतर्गत परीक्षकाच्या साह्यानेच परीक्षा घेण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या या परवानगीमुळे विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात १४ पेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. दहावी, बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेताना राज्य मंडळाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. यामध्ये शाळांना अंतर्गत परीक्षकासह तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिकांच्या परीक्षा घेणार आहेत. राज्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी ८० आणि २० गुणांचा पॅटर्न राबवला जातो. ८० गुण लेखी परीक्षेसाठी आणि २० गुण वर्षभराची प्रात्यक्षिकांची कामगिरी आणि अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा यासाठी दिले जातात. यापूर्वी अंतिम तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षेला बाह्यपरीक्षक असल्याने विद्यार्थी या परीक्षांना महत्त्व देत होते. परंतु, यंदा शाळेतील शिक्षकच परीक्षा घेणार असल्याने आता विद्यार्थ्यांवर प्रात्यक्षिकांच्या गुणांची खैरात केली जाईल, अशी भिती शिक्षण क्षेत्राच्या अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. यासह प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करूनच घेण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना एकाच वेळी न बोलावता टप्प्याटप्प्याने बोलवावे, असे राज्य मंडळाने सांगितले आहे. राज्य मंडळाच्या मार्गदर्शक सूचना १. प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत शिक्षकांनीच घ्याव्यात. २. परीक्षा घेताना विद्यार्थ्यांची गर्दी करू नये. ३. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान तपासावे. ४. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. ५. सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PMgmk5hG8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments