UCEED प्रवेशपत्र 'या' तारखेला होणार जाहीर, IIT मुंबईकडून नवी अपडेट

Admit Card 2022: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईने यूसीईईडी प्रवेशपत्र २०२२ ()जाहीर करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. डिझाईन परीक्षेसाठी अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रन्स परीक्षेचे प्रवेशपत्र ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार होणार होते. ते आता १२ जानेवारी २०२२ रोजी जाहीर होणार आहे. म्हणजेच प्रवेशपत्रासाठी उमेदवारांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार UCEED IITB च्या अधिकृत साइट uced.iitb वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत घेतली जाईल. UCEED परीक्षेत दोन भाग असेल. भाग-A कॉम्प्युटर आधारित आणि भाग-B मध्ये स्केचिंगशी संबंधित प्रश्न असतील. परीक्षेचा दुसरा भाग दिलेल्या पेपरवर पूर्ण करावा लागेल. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत दोन्ही भाग सोडविणे आवश्यक आहे. यूसीईईडी २०२२ (UCEED 2022) भारतातील २४ शहरांमध्ये आयोजित केले जात आहे. सीईईडी एकूण २०० गुणांची असेल आणि यूसीईईडी एकूण ३०० गुणांची असेल. संस्थेतर्फे ३१ जानेवारी २०२२ रोजी उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. UCEED चे निकाल १० मार्च २०२२ रोजी जाहीर केले जाणार आहेत. परीक्षेशी संबंधित सर्व अपडेट्स अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जाणार आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3j9K5OU वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येऊ शकेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. UCEED 2022: प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड UCEED २०२२ प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.uceed.iitb.ac.in वर जा. त्यानंतर होमपेजवरील 'नोंदणी' टॅबवर क्लिक करा. नोंदणी झाल्यावर 'नोंदणी पोर्टल' वर क्लिक करा. यानंतर 'ऑनलाइन नोंदणी पोर्टल' नावाचे एक नवीन पेज उघडेल. त्यानंतर 'लॉगिन' वर क्लिक करा. त्यानंतर पेज IIT-B वर पुनरनिर्देशित केले जाईल. 'नोंदणीकृत वापरकर्ता लॉगिन' अंतर्गत ईमेल आयडी आणि पासवर्ड भरा. त्यानंतर लॉगिनवर क्लिक करा. प्रवेशपत्राची लिंक पेजवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा. UCEED २०२२ चे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यात नाव, यूसीईईडी नोंदणी आयडी, रोल नंबर, जन्मतारीख, कॅटेगरी, फोटो, सही, परीक्षा वेळापत्रक, परीक्षा केंद्र तपशील तपासा. उमेदवारांसाठी देण्यात आलेल्या सूचना वाचा. प्रवेशपत्रात काही विसंगती आढळल्यास अधिकृत ईमेलआयडी uceed@iitb.ac.in वर संपर्क साधा. तसेच UCEED २०२२ च्या IIT-B कार्यालयाशी संपर्क साधू शकता. उमेदवारांना १४ जानेवारी २०२२ पर्यंत प्रवेशपत्रामध्ये दुरुस्ती करता येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32RHPHr
via IFTTT

Post a Comment

0 Comments