Also visit www.atgnews.com
'या' जिल्ह्यात गुरुजींची चिंता वाढली,५३ जणांची माहिती परीक्षा परिषदेने मागवली
हिंगोली : शिक्षक पात्रता परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले, त्यामुळे सन २०१३ नंतर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची माहिती परीक्षा परिषदेने मागवली होती. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील ५३ जणांचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे गुरुजींची चिंता वाढली आहे. पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी वर्गावर १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांची माहिती तसेच टीईटीच्या मूळ प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश राज्य परीक्षा परिषदेने दिले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती माध्यमिक व प्राथमिक शिक्षन विभागाने जमा केली आहे. अशा ५३ जणांची नुकतीच माहिती सादर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करून ही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आली. परिक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी पैसे घेऊन गुण वाढवून विद्यार्थ्यांना शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता असल्याने अशा प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. अशाप्रकारे पात्र करून शिक्षक नोकरीला लागले आहेत का...? याची खातरजमा ज्या परीक्षा परिषदेकडून केली जाणार आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयुक्तांनी कागदपत्र पडताळणी च्या सूचना दिल्या आहेत. या प्रकारामुळे शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. परीक्षा परिषदेकडून या प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यानंतर खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे. अपात्र असतानाही पात्र केलेल्या शिक्षकांचा शोध राज्य परीक्षा परिषदेकडून करण्यात आला आहे. त्या संदर्भात जिल्ह्यातील ५३ शिक्षकांची महिती सादर करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा ३० समावेश आहे. तर २३ माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये बारकाईने तपासणी केली जात असल्यामुळे दोषी ठरवणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार असून त्यामुळे शिक्षकांची चांगली झोप उडाली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32ZTsvR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments