Also visit www.atgnews.com
देशात खगोलशास्त्र शिक्षणाची चार केंद्रे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई जगात खगोलशास्त्र शिक्षणाला पाठिंबा देणाऱ्या ''च्या 'ऑफिस ऑफ अॅस्ट्रॉनॉमी फॉर एज्युकेशन'या उपक्रमांतर्गत भारतात चार प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. शालेयस्तरावर खगोलशास्त्र अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी ही केंद्रे काम करणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुण्यातील 'आयुका' आणि मुंबईतील 'होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र' यांच्या अंतर्गत या केंद्रांचे व्यवस्थापन होईल असे जाहीर केले आहे. या नवीन केंद्रांमध्ये खगोलशास्त्र (अध्यापन/ शिकविण्याच्या) पद्धती आणि माध्यमिक; तसेच उच्च-माध्यमिक स्तरांवरील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकरिता साधने आणि अध्यापनाची भाषा यावर काम करण्यावर भर दिला जाईल, असे आयुकाचे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले. तर वर्गांमध्ये खगोलशास्त्र शिकवताना शिक्षकांच्या समजुती, त्यांची क्षमता आणि आत्मविश्वासाची पातळी जाणून घेणे, हे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या पुनर्रचनेसाठी महत्त्वाचे असेल, असे मत आयुकाचे सुहृद मोरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी जोडले जाणार हे केंद्र शालेयस्तरावर खगोलशास्त्र शिक्षणात औपचारिक संशोधनदेखील करणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील खगोलशास्त्राशी संबंधित बोधीय भूदृश्य, सांकल्पिक सूचीसारख्या साधनांचा वापर करून पद्धतशीरपणे संशोधन केले जाईल. त्याच वेळी खगोलशास्त्रातील संकल्पना नकाशे तयार केल्यास अध्ययनाची दिशा अधिक चांगली समजून घेता येईल, असे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे अनिकेत सुळे यांनी सांगितले. या केंद्रांमुळे देशात खगोलशास्त्राविषयीचे अधिक ज्ञान उपलब्ध होईल याचबरोबर अधिकाधिक विद्यार्थी याच्याशी जोडले जाऊ शकतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iMSk8Rn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments