Also visit www.atgnews.com
कमी शिक्षण असलेल्यांना एफएसमध्ये काम करण्याची संधी, पगार जाणून घ्या
AFS Nagpur : सरकारी पदभरतीच्या बहुतांश जागांसाठी दहावी/बारावी/पदवीधर किंमा समकक्ष शिक्षण पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. पण आता कमी शिक्षण असलेल्यांना देखील नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना एअर फोर्स स्कूलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. वायुसेना विद्यालय नागपूर (Air Force School Vayusena Nagar Nagpur) येथे वॉचमन पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. वायुसेना विद्यालय नागपूर येथे चौकीदार पदाच्या ३ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्था किंवा सरकारी शाळेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. पात्रता या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची १६० सेमी असणे आवश्यक आहे. तसेच वजन हे उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. यासोबतच नजर ६/६ असणे आवश्यक आहे. योबतच उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय २१ ते ४० दरम्यान असावे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या उमेदवारांना पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित कामाचा अनुभव असलेल्या आणि एअर फोर्स स्कूलजवळ घर असलेल्या उमेदवारांना पदभरतीमध्ये प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घ्या. अर्ज आलेल्या उमेदवारांची सर्वप्रथम शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवाराची मेडिकल टेस्ट घेण्यात येईल. महत्वाची कागदपत्रे पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. अर्ज प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या १५ दिवसांच्या आत अर्ज येणे अपेक्षित आहे. यासाठी अधिकृत वेबसाइट https://ift.tt/5AwGFTY ला भेट द्यावी लागेल. यावरुन अर्ज डाऊनलोड करावा आणि afschoolrecruitment@gmall.com या ईमेल आयडीवर पाठवावा. एअर फोर्स स्कूलच्या गेटवर देखील याची हार्ड कॉपी मिळू शकले. हा अर्ज मुख्य गेटवरील ड्रॉप बॉक्समध्ये टाकावा. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून सूचित करण्यात येईल. यासाठी अर्ज भरताना ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांना ०७१२-२५११४०७/९१४६०७१४८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम तारीख उमेदवारांना १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NeaZRJi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments