Also visit www.atgnews.com
नीट पीजी २०२२ परीक्षेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला
परीक्षा (National Eligibility cum Entrance Test)स्थगित करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात ()८ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, दुसरीकडे ही परीक्षा ६ ते ८ आठवडे पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. परिणामी उमेदवारांना (MBBS Students)मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, याचिकेतील अन्य मुद्द्यांवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायमूर्ति डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ति सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, त्यांना शुक्रवारी दुपारी ही माहिती मिळाली की परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकण्यात आली आहे. याचिकाकर्त्या सहा विद्यार्थ्यांच्या वतीने युक्तीवाद करणारे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी म्हटले की परीक्षा सहा ते आठ आठवडे लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल. परंतु काही मुद्दे अद्याप शिल्लक आहेत. इंटर्नशीप कालावधी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. पण दिलेल्या मुदतीत इंटर्नशीप करणं डॉक्टरांना कोविड ड्युटीमुळे शक्य झालेले नाही. त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधत म्हटले की विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी चार फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. त्यावर खंडपीठाने सांगितले की ही मुदत वाढवता येईल, पण आम्हाला दुसऱ्या बाजुचे देखील म्हणणे ऐकायचे आहे. अन्य एका प्रकरणात केंद्र सरकारच्या वतीने युक्तीवाद करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांना सांगण्यात आले आहे की त्यांनी एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या वतीने मागण्यात आलेल्या दिलाशासंदर्भात निर्देश द्यावेत. जैन एका अन्य प्रकरणी सुनावणीत उपस्थित राहणार आहेत. जर या प्रकरणी केंद्राकडून कोणी उपस्थित राहत नसेल तर सोमवार किंवा मंगळवारी तसे सर्वोच्च न्यायालयाला सूचित केले जाऊ शकते. विद्यार्थ्यांच्या वतीने याचिका लढणारे अन्य वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी देखील या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ठेवण्याची विनंती कोर्टाला केली. त्यानंतर खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी रोजी निश्चित केली. दुबे लॉ चेम्बर्स द्वारे दाखल याचिकेत याचिकाकर्ता शिवम सत्यार्थी आणि अन्य यांनी दावा केला आहे की अनेक एमबीबीएस ग्रॅज्युएट अनिवार्य इंटर्नशिप कालावधी पूर्ण न करू शकल्याने परीक्षा देऊ शकणार नाहीत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CGu1XZz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments