MPSC Exams 2022: एमपीएससीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षा गट अ आणि गट ब या परीक्षेसाठी ()अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी आयोगाकडून देण्यात आली आहे. १ मार्च २०२१ ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली होती, त्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने १७ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय जारी करून पुन्हा एकदा परीक्षेची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या उमेदवारांसाठी आयोगाकडून ही परीक्षा घेतली जात असून त्यासाठी ४ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु आयोगाकडून पुन्हा एकदा ९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या उमेदवारांना ११ फेब्रुवारीपर्यंतद्वारे स्टेट बँकेत परीक्षा शुल्क भरता येईल. दरम्यान, ज्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद, लातूर व कोल्हापूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती आयोगाने ट्विट करून दिली. सोबतच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९मधील पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या नागपूर आणि अमरावती केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे १४ व १५ फेब्रवारी तसेच १६,१७ व १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aueb6SV
via IFTTT

Post a Comment

0 Comments