Also visit www.atgnews.com
दहावीसाठी इंटरमिजिएट चित्रकला ऑनलाइन परीक्षांच्या तारखा जाहीर
'राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कला गुणांसाठी २२ आणि २३ फेब्रुवारीला इंटरमिजिएट चित्रकला श्रेणी परीक्षा () ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.एलिमेंटरी परीक्षेबाबतही आगामी काळात स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल,' अशी माहिती कला संचालक राजीव मिश्रा यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. या परीक्षेमुळे सवलतीचे अतिरिक्त कला गुण विद्यार्थ्यांना देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त कला गुणांचा लाभ मिळण्यासाठी चित्रकलेची श्रेणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक, सूचना १२ ते २० फेब्रुवारीपर्यंत कला संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी कला संचालनालयाच्या वेबसाइटवर भेट द्यावी, असे आवाहन मिश्रा यांनी केले आहे. ‘शाळा तेथे केंद्र’ दरम्यान, दहावी, बारावी लेखी परीक्षांसाठी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा देता यावी, यासाठी शाळा तेथे केंद्र ही योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ३२ हजारांहून अधिक परीक्षा केंद्रे व उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. १५ विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. लसीकरण बंधनकारक नाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलेले नाही. मात्र, अधिकाधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी ज्या विद्यार्थ्यांना करोना झाला आहे, अशांना तीन महिने लस घेता येणे शक्य नाही. यामुळेच लसीकरण बंधनकारक न करता त्यासाठी प्राधान्य देण्यात आले असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5Ab8uoy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments