Also visit www.atgnews.com
UGC Notice: यूजीसीकडून कॉलेज-विद्यापीठ पुन्हा सुरू करण्यास परवानगी
Notice: देशातील कोरोनाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असून शाळा कॉलेज सुरू (School, ) केले जात आहेत. त्याचबरोबर यूजीसीनेही कॉलेजांसाठी नोटीस () जाहीर केली आहे. या नोटीसनुसार, ऑफलाइन वर्ग (Offline Class) आणि परीक्षांसाठी (Offline Exam) विद्यापीठे आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यूजीसीतर्फे ११ फेब्रुवारीला यासंदर्भातील नोटीस जाहीर करण्यात आली. यूजीसीच्या नोटिसनुसार, 'आपल्या संबंधित क्षेत्रामधील करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कॅम्पस उघडले जाऊ शकतात. उच्च शिक्षण संस्था पुन्हा उघडण्याचे किंवा हायब्रीड माध्यमातून सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरु करताना करोना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश यूजीसीने दिले आहेत. संबंधित क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कॉलेज कॅम्पस उघडले जाऊ शकतात. करोना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक प्रोटोकॉल/मार्गदर्शक तत्त्वे/सूचना/सल्ल्याचे पालन करून ऑफलाइन/ऑनलाइन/दोन्ही मोडमध्ये वर्ग आणि परीक्षा आयोजित करा असे यूजीसीने म्हटले आहे. दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर संस्थांनी करोना प्रतिबंध नियमांची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठे जवळपास दोन वर्षांपासून बंद आहेत. महाविद्यालये आणि विद्यापीठ पुन्हा सुरु व्हावी यासाठी विद्यार्थी आग्रही होते. काही ठिकाणी तर या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आले. दिल्ली विद्यापीठ १७ फेब्रुवारीपासून दिल्ली विद्यापीठातर्फे १७ फेब्रुवारीपासून पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ऑफलाइन वर्गसुरु होण्यासाठी यूजीसीच्या आदेशाची वाट पाहीली जात होती. करोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर केंद्र सरकारने शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गेल्या काही महिन्यात करोना रुग्णसंख्येत घट झाली तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लसीकरणदेखील पूर्ण झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळवून देण्यासाठी शाळा, कॉलेज पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VguQpx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments