कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार

Recruitment: भारत सरकारच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंटॉंन्मेंट बोर्ड देहुरोड पुणे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या प्रशासकीय विभागात सहायक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer), ज्युनिअर क्लर्क (Junior Clerk), स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector ) पदाच्या एकूण ११ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. असिस्टंट मेडिकल ऑफिसर असिस्टंट मेडिकल ऑफिसर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएस डिग्री आणि संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराचे वय २३ ते ३२ वर्षांपर्यंत असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५६, १०० ते १,७७,५०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. ज्युनिअर क्लर्क ज्युनिअर क्लर्क पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतून पदवी आणि कॉम्प्युटरचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. तसेच इंग्रजी आणि हिंदी टायपिंगचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९, ९०० ते ६३, २०० पर्यंत पगार देण्यात येईल. स्टाफ नर्स स्टाफ नर्स पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे नर्सिंगमध्ये डिग्री किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. स्टाफ नर्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५, ४०० ते १,१२,४०० रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदासाठी इच्छुक उमेदवार बारावी आणि सरकारी संस्थेतून सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५, ५०० ते ८१, १०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी आपला अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, , देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहू रोड, पुणे, पिनकोड-४१२१०१ या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिनांक ४ मार्च २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f5ibnIy
via IFTTT

Post a Comment

0 Comments