Also visit www.atgnews.com
BMC Budget 2022: पालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प सादर; २,५१४ वर्गखोल्या होणार डिजीटल
मुंबई महापालिकेचा २०२२- २०२३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात येत आहे. शिक्षण विभागासाठी यंदा एकूण २८७०.२४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भांडवली कामांसाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन झाल्याचे पडसाद या अर्थसंकल्पावर दिसून आले. पालिका शाळांच्या वर्ग खोल्या डिजीटल करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांच्या २,५१४ वर्ग खोल्या डिजीटल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ८ माध्यमांच्या ९६३ प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये ६०३१ शिक्षक सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. २४३ माध्यमिक शाळांमधून १३८३ शिक्षकांच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले जात आहेत. मोफत वस्तूंसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी सात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २५१४ वर्ग खोल्या डिजिटल होणार आहेत. यासाठी प्राथमिक वर्गांसाठी २३.२५ कोटी रुपये तर माध्यमिक वर्गांसाठी ३.७६ कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका शिक्षण अर्थसंकल्पातील अन्य महत्त्वाचे मुद्दे - - २२४ संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण - ११.२० कोटींची तरतूद - शाळा व्यवस्थापन माहिती यंत्रणा - ५७ लाखांची तरतूद - नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नऊ लाखांची तरतूद यामध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार. - मुलींची उपस्थिती भत्ता प्राथमिकसाठी ७ कोटी, माध्यमिकसाठी ४७ लाख - बेस्ट प्रवासासाठी प्राथमिक ३ कोटी, माध्यमिक १.२५ कोटी - बालवाडी वर्गांच्या सक्षमीकरणासाठी - ९.०५ कोटींची तरतूद - केंब्रिज विद्यापीठाशी संलग्लित आय.जी.सी.एस.ई व आयबी शिक्षण मंडळाशी शाळा जोडण्यासाठी १५ कोटींची तरतूद - कौशल्य प्रशिक्षणासाठी - १.४० कोटी - शिक्षण विभागांच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी - १ कोटींची तरतूद
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/7So3ivDpL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments