Also visit www.atgnews.com
Bsc Nursing Syllabus 2022: बीएस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या बीएस्सी नर्सिंगच्या अभ्यासक्रमामध्ये (Bsc 2022) यंदापासून बदल होणार आहे. सेमिस्टर पॅटर्न आणि ग्रेडिंग सिस्टीमसह सार्वजनिक आरोग्याशी निगडित विषयांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. 'इंडियन नर्सिंग कौन्सिल'च्या (आयएनसी) सूचनेनुसार आरोग्य विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून या अभ्यासक्रमातील बदलांची अंमलबजावणी केली जाणार असून, विद्यापीठाशी संलग्न सर्व नर्सिंग महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांना हा बदल लागू राहणार आहे. यंदा प्रवेश घेणारे विद्यार्थी या बदललेल्या अभ्यासक्रमाची पहिली बॅच म्हणून ग्राह्य धरले जाणार असून, टप्प्याटप्प्याने चार वर्षांत पूर्ण पदवी अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. यंदापासून या अभ्यासक्रमाला सेमिस्टर पद्धती लागू होणार असून, तीन वर्षांचा अभ्यासक्रम सहा सेमिस्टरमध्ये विभागला जाणार आहे. यासह विविध मोड्युल्सचा समावेश या अभ्यासक्रमात करण्यात आला असून, काही सक्तीची, तर काही पर्यायी मोड्युल्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परीक्षेतील मूल्यमापनासाठी टक्केवारीऐवजी आता ग्रेडिंग पद्धती वापरली जाणार आहे. 'आयएनसी'च्या सूचनेनुसार देशभरातील सर्व आरोग्य विद्यापीठांना हा बदल करावा लागणार आहे. जवळपास सहा वर्षांनंतर नर्सिंगच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून, यामध्ये काही नवीन विषयांचा अंतर्भावही करण्यात आल्याचे विद्यापीठाच्या नर्सिंग अभ्यास मंडळामार्फत सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे, नवीन उपचार पद्धतींबाबत माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. पॅरामेडिकल क्षेत्राच्या बदलत्या गरजा ओेळखून हा अभ्यासक्रम बदलण्यात आल्याची माहिती या अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. काळानुरूप शिक्षणात बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळेच 'आयएनसी'ने येत्या शैक्षणिक वर्षापासून हा बदल केला आहे. या बदलामुळे हा अभ्यासक्रम अधिक विद्यार्थीकेंद्री बनला आहे. पारंपरिक ज्ञानासोबत आधुनिक संकल्पनांचा समावेश या अभ्यासक्रमात असून, त्याचा नक्कीच फायदा होईल. -डॉ. महंमद हसन, अध्यक्ष, नर्सिंग अभ्यास मंडळ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aFVP0Sx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments