Also visit www.atgnews.com
Government Job: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
BHEL Recruitment: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये ( ) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. भेलच्या नागपूर (BHEL Nagpur ) कार्यालयाअंतर्गत ही भरती होणार आहे. भारत सरकारच्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये वेल्डर (Welder)पदाच्या एकूण ७५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. वेल्डर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित वेल्डर ट्रेडमध्ये आयटीआयपर्यंत शिक्षण पूर्ण असणे अनिवार्य आहे. यासोबतच बॉयलर वेल्डिंगचं सर्टिफिकेशन ट्रेनिंग असलेल्या उमेदवारांना या पदभरतीमध्ये प्राधान्य मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वेल्डिंग आणि प्रेशर पार्ट जॉइंट्स वेल्डिंग (Pressure part joints welding) हे काम देखील करावे लागणार आहे. त्यामुळे या कामाची माहिती असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे संबंधित वेल्डिंगच्या कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. वेल्डर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासोबतच उमेदवाराचा मेडिक्लेम पॉलिसीचा २ लाखांचा विमा उतरविला जाणार आहे. योबसतच सेकंड क्लास स्लीपर कोचमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज अधिकृत वेबसाइट १४ फेब्रुवारी रोजी पाठवायचा आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BRz29Eu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments