Also visit www.atgnews.com
NEET PG 2022: नीट पीजी परीक्षा लांबणीवर; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
NEET PG Exam 2022 Date Postponed: वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (National Eligibility cum Entrance Test) म्हणजेच नीट पीजी परीक्षा २०२२ संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला. ही परीक्षा १२ मार्च २०२२ रोजी होणार होती. ही परीक्षा ६ ते ८ आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा लवकरच केली जाणार आहे. दरम्यान, सहा एमबीबीएस विद्यार्थ्यांनी या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र तत्पूर्वी काही तास अगोदर आरोग्य मंत्रालयाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. इंटर्नशीपच्या कालावधीच्या समस्येवर देखील सुनावणी घेण्यात आली. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला (NBE) कळवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवार ४ फेब्रुवारी २०२२ ही परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र आता परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे या मुदतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. हेही वाचा :
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MqPsTy1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments