Also visit www.atgnews.com
Hijab Controversy: कर्नाटकातील शाळा आजपासून पुन्हा सुरु
Karnataka : कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेला हिजाबचा वाद थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये आजपासून सुरु झाले आहेत. कर्नाटक राज्य सरकारने यासंदर्भातील निर्णय दिला. '१४ फेब्रुवारी २०२२ पासून दहावीपर्यंतच्या शाळा (कर्नाटक शाळा पुन्हा उघडणे) उघडतील. तसेच परिस्थितीचा आढावा घेऊन ज्युनिअर कॉलेज तसेच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल', अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. यासोबत डीसी, एसपी आणि शाळा प्रशासनाला शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्नाटकातील उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये १६ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा १४ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी अंतरिम आदेश दिला होता. त्याअंतर्गत शाळा तात्काळ सुरू करून धार्मिक कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शाळा उघडण्याच्या आदेशानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सर्व जिल्ह्यांतील जिल्हा अधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. लवकरच कॉलेज सुरू करण्याचा निर्णय हुबळी येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, उद्यापासून दहावीपर्यंतच्या शाळा सुरू होतील. मी डीसी, एसपी आणि शाळा प्रशासनाला शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च श्रेणीच्या शाळा आणि पदवी महाविद्यालयांच्या स्थितीबाबत आढावा बैठक घेऊन ते नंतर सुरू केले जातील, असे ते म्हणाले. हिजाब विवाद सुनावणी कर्नाटकच्या विविध भागात हिजाबच्या विरोधात आणि समर्थनार्थ निदर्शने तीव्र झाल्यामुळे, सरकारने राज्यातील सर्व हायस्कूल आणि महाविद्यालयांना ९ फेब्रुवारीपासून तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने १४ फेब्रुवारीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळांमधील ड्रेस कोडबाबत राज्य सरकारच्या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर कर्नाटक उच्च न्यायालयाने सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थी धार्मिक पोशाखाचा आग्रह धरू शकत नाहीत असे यावेळी सरन्यायाधीश रितू राज अवस्थी यांनी म्हटले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LeGSd6y
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments