ICAI CA Result 2022: सीए फाउंडेशन आणि फायनलचा निकाल आज जाहीर होणार

CA Result 2022: चार्टर्ड अकाउंटंट फायनल आणि फाउंडेशनचा आयसीएआय सीए निकाल २०२२ च्या घोषणेची वाट पाहत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे आज १० फेब्रुवारी २०२२ रोजी सीए अंतिम निकाल २०२२ आणि निकाल २०२२ जाहीर केला जाणार आहे. आयसीएआय सीए निकाल २०२२ च्या घोषणेसह, संस्थेतर्फे परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे सीए स्कोअर कार्ड २०२२ देखील जाहीर केले जाणार आहे. आयसीएआयने दोन दिवसांपूर्वी सीए निकाल २०२२ च्या तारखेबद्दल माहिती दिली होती. ज्या उमदेवारांनी या परीक्षा दिल्या होत्या ते आपला निकाल icai.org या संकेतस्थळावर पाहू शकतील. ICAI CA निकाल २०२२ कधी? आयसीएआयने ८ फेब्रुवारी रोजी सीए फाउंडेशन निकाल २०२२ आणि सीए अंतिम निकाल २०२२ संदर्भात एक नोटीस जारी केली होती. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन्ही अभ्यासक्रमांसाठी सीए निकाल १० फेब्रुवारी किंवा ११ फेब्रुवारीच्या संध्याकाळी घोषित केला जाईल. गेल्या काही वर्षांचे उदाहरण पाहिल्यास आयसीएआयतर्फे सीए निकालाची घोषणा यापूर्वी जाहीर केलेल्या दोन तारखांपैकी पहिल्या तारखेला करण्यात आली आहे. त्यामुळे ICAI CA निकाल २०२२ आज जाहीर होण्याची शक्यता जास्त आहे. वेबसाइटवर सीए निकाल २०२२ : असा पाहा ICAI ने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, सीए परीक्षा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर लिंक सक्रीय करण्यात आली आहे. विद्यार्थी caresults.icai.org आणि icai.nic.in वर त्यांचे CA फाउंडेशन निकाल २०२१ किंवा सीए अंतिम निकाल २०२१ पाहू शकतील. पोर्टलवरील लिंकवर क्लिक करून विद्यार्थी निकालाच्या पेजवर जा. नोंदणी क्रमांक किंवा पिन नंबर, रोल नंबर सबमिट करा. स्क्रीनवर त्यांचा निकाल दिसेल. ईमेलवर सीए निकाल २०२२ : असा पाहा याआधी आयसीएआयने फेब्रुवारी २०२२ रोजी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.यानुसार CA निकाल २०२२ ईमेलवर पाहिजे असलेल्या उमेदवारांकडून त्यांचे ईमेल आयडी मागविण्यात आले आहेत. कुठे नोंदणी करायची? डिसेंबर २०२१ मध्ये आयसीएआय द्वारे विविध तारखांना आयोजित केलेल्या किंवा फाउंडेशन कोर्सच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना ईमेलद्वारे निकाल मिळविण्यासाठी अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org या परीक्षा पोर्टलवर जा. त्यानंतर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. यानंतर ईमेलवर निकाल मिळविण्यासाठी अर्ज करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/yipIVCe
via IFTTT

Post a Comment

0 Comments