CBSE Term 2 Exams: सीबीएसईच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ऑफलाइन होणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या () अभ्यासक्रमाच्या दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्रातील परीक्षा (CBSE Term 2 Exams) २६ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. याविषयीची सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याविषयी 'सीबीएसई'चे परीक्षा नियंत्रणक सन्यम भारद्वाज म्हणाले, 'सध्याची करोनाची परिस्थिती आणि या विषयातील विविध घटकांबरोबर चर्चा करण्यात आली. त्यानंतर, दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षा २६ एप्रिलपासून घेण्यात येतील. दहावी आणि बारावीविषयीची माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.' या परीक्षा नियोजित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. तसेच, सोशल मीडियावर पसरणाऱ्या माहितीवर विश्वास ठेऊ नये. अधिकृत संकेतस्थळांवरील सूचना पाहाव्यात, अशी सूचनाही विद्यार्थी आणि पालकांना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पहिल्या सत्राच्या निकालाविषयी काहीही सांगण्यात आलेले नाही. दरम्यान, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रात्यक्षिक सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 'सीबीएसई'कडून यंदा प्रथमच दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्यात येत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या वर्षी परीक्षा घेता आली नव्हती. पहिल्या सत्रातील निकाल आणि दुसऱ्या सत्राच्या परीक्षेविषयी अनेक अफवा पसरत आहेत. त्यामुळे, सोशल मीडियावर विश्वास ठेवू नये,' असे आवाहन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PeuJtEB
via IFTTT

Post a Comment

0 Comments