Also visit www.atgnews.com
ICCR Initiative: भारतीय महाकाव्ये, वेद, कला आणि वारसा या विषयांवर अभ्यासक्रम
Initiative: इंडियन काऊन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन्स (Indian Council of Cultural Relations, ICCR) च्या नवीन उपक्रमांतर्गत, भारतीय महाकाव्य (), वेद (), कला (art) आणि वारसा (heritage) या विषयांवर ऑनलाइन अभ्यासक्रम (Online courses) सुरु केला जाणार आहे. आयसीसीआरचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे (ICCR President Vinay Sahasrabuddhe) यांनी ही माहिती दिली. पारंपारिक भारतीय ज्ञान, कला, वास्तुकला, कालातीत महाकाव्ये आणि वेद यांचा जागतिक समुदायामध्ये प्रसार करण्याच्या उद्देशाने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. आयसीसीआरच्या पुढाकाराने लवकरच नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यासाठी वेगळे पोर्टल २ एप्रिलपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणालीचे जागतिकीकरण राज्यसभा खासदार सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना, 'आझादी का अमृत महोत्सवा'अंतर्गत सुरू असलेल्या सोहळ्यात आम्ही पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणालीच्या जागतिकीकरणाचे काम सुरू करणार आहोत. याअंतर्गत परदेशात राहणाऱ्या लोकांना आपल्या देशातील पारंपरिक ज्ञान, कला आणि संस्कृतीची माहिती ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. हे ऑनलाइन अभ्यासक्रम महाभारत आणि रामायण यांसारख्या महाकाव्यांतील संदेश प्रसारित करतील आणि आपल्या कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देतील. रसगुल्ला बनवण्यापासून मधुबनी कलेची तत्त्वे सहस्रबुद्धे म्हणाले की, पोर्टलवर भारतीय संस्कृतीविषयीची सर्व माहिती उपलब्ध असेल. चार तासांपासून ते ४० तासांपर्यंतचे अल्प-मुदतीचे आणि दीर्घकालीन ऑनलाइन अभ्यासक्रम असतील. यामध्ये रसगुल्ला बनवण्याच्या रेसिपीपासून ते वारली चित्रकला, मधुबनी कलेची मूलभूत तत्त्वे, अजिंठा आणि एलोरा गुंफा कला, वेदांची मूलभूत तत्त्वे आणि शिकवण, रामायण आणि महाभारताचा परिचय, बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र आणि इतर विषय देण्यात येणार आहेत. पुणे विद्यापीठ शैक्षणिक भागीदार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला या कार्यक्रमाचे शैक्षणिक भागीदार करण्यात आले आहे. यामध्ये इतर संस्था देखील नंतर सामील होऊ शकतात, असे सहस्रबुद्धे म्हणाले. हा कायमस्वरूपी अभ्यासक्रम सर्वांसाठी खुला आहे. यामध्ये वय किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा कोणताही आडकाठी असणार नाही आणि त्यासाठीची शुल्क अगदी नाममात्र असेल असेही ते म्हणाले. पुनर्जन्मवर अभ्यासक्रम बनारस हिंदू विद्यापीठ (Banaras Hindu University,BHU), वाराणसीने हिंदू अभ्यासात नवीन एमए अभ्यासक्रम सुरू केला आहे. बीएचयूचे कुलगुरू विजय कुमार शुक्ला यांनी या अभ्यासक्रमाचे उद्घाटन केले. हा अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठातर्फे दोन वर्षांचा हिंदू धर्म अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू विजय कुमार शुक्ला यांनी दिली. सुरुवातीला ४० सीट्ससाठी हा अभ्यासक्रम असणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37QaAtl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments