कमी किंमतीत घर बांधणी शक्य, IIT Madras कडून तंत्राचे संशोधन

IIT : देशातील नागरिकांना कमी किंमतीत घर बांधणी शक्य होणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रासतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी हाऊसिंग इनक्यूबेटर 'आशा' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कमी किंमतीची परवडणारी घरे बांधण्यासाठी याची मदत होणार आहे. बांधकाम क्षेत्रातील स्टार्टअप्सना मदत करण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधणे यामागचे उद्दिष्ट आहे. यामुळे अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. एक्सेलरेटर अफोर्डेबल सस्टेनेबल हाउसिंग एक्सेलरेटर्स गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाचा हा एक उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत, बाजारात नसलेल्या आणि बाजारात येण्यासाठी तयार असलेल्या तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यात येते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक स्टार्टअप्सना इनक्यूबेटरची मदत लागणा आहे. यामध्ये टीवास्टा (Tvasta) चा देखील समावेश आहे. टीवास्टाने करोना फ्रंटलाइन हेल्थकेअर कर्मचार्‍यांनी वापरलेले पीपीई सुरक्षितपणे काढून टाकण्यासाठी देशातील पहिले थ्रीडी प्रिंट केलेले घर आणि पहिले थ्रीडी प्रिंट केलेले डॉफिंग युनिट तयार केले आहे. तंत्रज्ञानाची ओळख, नाविन्यपूर्ण कल्पनांना तांत्रिक सहाय्य, त्यांना व्यवसाय मार्गदर्शन आणि पायाभूत सुविधांबाबत सल्ला देणे हे आशा (ASHA) इनक्यूबेटरचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात आशा-भारत केंद्राच्या माध्यमातून आशा तंत्रज्ञानाच्या प्रभावी डिझाइनसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमावली तयार करण्यात येणार आहेत. यासाठी , खरगपूर, मुंबई आणि रुरकी या पाच संस्थांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त CSIR-NEIST, जोरहाट मध्ये देखील व्यवस्था करण्यात आली आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञान प्रमोशन काऊन्सिलचे कार्यकारी संचालक केआर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाचा आशा उपक्रम PMAY-U च्या तंत्रज्ञान उप-मिशन अंतर्गत चालवला जात आहे. या अंतर्गत गृहनिर्माण क्षेत्रातील तंत्रज्ञान उद्योगांना मदत केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Up3RWOB
via IFTTT

Post a Comment

0 Comments