Also visit www.atgnews.com
IGNOU January २०२२ सत्रासाठी पुनर्नोंदणीची अंतिम तारीख वाढवली
January 2022: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University, IGNOU) तर्फे जानेवारी सत्रासाठी पुनर्नोंदणीची नोंदणीची तारीख वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारीपर्यंत या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप या सत्रासाठी अर्ज करता आले नाही ते आता अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. इग्नू जानेवारी २०२२ सत्रासाठी री-रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२२ होती. यापूर्वी ३१ डिसेंबर २०२१ होती. आणि आता ही तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या ट्विटर हँडलवरूनही याची घोषणा करण्यात आली. या व्यतिरिक्त विद्यार्थी खाली दिलेल्या सोप्या थेट फॉलो करुन देखील अर्ज करु शकतात. असा करा अर्ज उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जा. 'Application Process' या लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि लॉगिन करा. अर्ज भरा आणि कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा. अर्ज सबमिट केल्यावर प्रत डाउनलोड करा. पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या. IGNOU तर्फे २०० हून अधिक ओडीएल अभ्यासक्रम आणि १६ ऑनलाइन अभ्यासक्रम शिकविले जातात. कार्यक्रमांची सविस्तर यादी आणि इतर माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ओडीएल अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या एससी/एसटी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात सवलत देण्यात येते. इग्नूने कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) सह व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण उच्च शिक्षणाशी जोडण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. तरुणांसाठी कामाच्या संधी निर्माण करणे आणि व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण फ्रेमवर्क मजबूत करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. यासोबतच जवळपास ३२ NSTIs, ३००० ITIs, ५०० PMKKs आणि ३०० JSSs नोंदणी, परीक्षा आणि कार्य केंद्रे म्हणून इग्नूशी जोडले जाणार आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अंतर्गत बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) संस्कृत (BASKH) आणि बॅचलर ऑफ आर्ट्स (ऑनर्स) उर्दू (BAUDH) अभ्यासक्रम सुरू केले आहेत. याअंतर्गत सन २०२२ ची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. नुकताच या अभ्यासक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. यूजी आणि पीजी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार ssc@ignou.ac.in हा ईमेल आयडी आणि ०११-२९५७२५१३ आणि २९५७२५१४ या क्रमांकांद्वारे इग्नूशी संपर्क साधू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ts9Rc1u
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments