Also visit www.atgnews.com
RBI Assistant परीक्षेचा नमुना आणि अभ्यासक्रम जाणून घ्या
2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India, RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या १००० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेच्या rbi.org.in या वेबसाइटवर फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च आहे. लेखी परीक्षेद्वारे (RBI Assistant Exam 2022) या पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ज्यामध्ये प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीचा समावेश आहे. या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करावी. आरबीआय परीक्षा प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी या तीन टप्प्यांत घेतली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, (RBI) मध्ये सहाय्यक पदांची प्राथमिक परीक्षा २६, २७ मार्च २०२२ रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. तर मुख्य परीक्षा मे महिन्यात होणार आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेस उत्तीर्ण होणारे उमेदवार भाषा प्राविण्य चाचणीत बसण्यास पात्र असतील. परीक्षेत जास्त वेळ नसेल. त्यामुळे उमेदवारांनी आतापासूनच परीक्षेच्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसार तयारी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे. आरबीआय सहाय्यक भरती नोटिफिकेशननुसार, मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेले किंवा अंतिम वर्ष सेमिस्टर परीक्षा दिलेले उमेदवार यासाठी पात्र असतील. तसेच, कट ऑफ तारखेनुसार उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार सवलत दिली जाणार आहे. आरबीआय सहाय्यक परीक्षा नमुना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा ३ टप्प्यांत घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात पूर्वपरीक्षा होणार असून त्यात एकूण १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. ज्यामध्ये इंग्रजीतून ३० प्रश्न, संख्यात्मक क्षमतेचे ३५ आणि तर्कक्षमतेचे ३५ प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण दिलेला आहे. तर प्राथमिक परीक्षेसाठी ६० मिनिटे दिली जातील. अभ्यासक्रम मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. ज्यामध्ये रीझनिंग, इंग्रजी, संख्यात्मक क्षमता, जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटरमधून ४०-४० प्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्न प्रत्येकी १ गुणाचे असतील. ज्यासाठी उमेदवारांना १३५ मिनिटे दिली जातील. त्याच भाषा प्राविण्य चाचणी अंतर्गत उमेदवारांची संबंधित राज्याची भाषा परीक्षा घेतली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/RF6TgO9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments