IIT Madras Online Course: बँकिंग परीक्षांच्या तयारीसाठी IIT मद्रासचा प्रिमिअर बँकर कोर्स

Premier Banker Course: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास ( IIT Madras ) द्वारे डिजिटल स्किल्स अकादमीने बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 'प्रीमियर बँकर' हा ऑनलाइन कोर्स सुरू केला आहे. प्रीमियर बँकर कोर्समध्ये ४ ते ६ महिन्यांसाठी २४० तासांपेक्षा जास्त प्रशिक्षण असेल. अभ्यासक्रमाच्या मॉड्युलमध्ये शेकडो प्रश्न आणि विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अनेक असाइनमेंट्स असतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मॉड्यूल यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर शिक्षण केंद्र, IIT मद्रास कडून प्रमाणपत्र मिळेल. इच्छुक विद्यार्थी अधिक माहिती IIT मद्रास डिजिटल स्किल्स अकादमी, skillscademy.iitm.ac.in च्या अधिकृत वेबसाइटवर मिळवू शकतात . अर्ज करणारे उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासह, द्वितीय किंवा तृतीय वर्ष पदवीधर विद्यार्थी नोंदणीसाठी अर्ज करू शकतात, त्यांच्या प्रवेशाचा विचार केला जाईल. बँकिंग किंवा फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील पूर्वीचा अनुभव प्राधान्य दिलेला आहे परंतु अनिवार्य नाही. या अभ्यासक्रमात बँकिंग आणि वित्त, डिजिटल बँकिंग, म्युच्युअल फंड, बँकिंग आणि वित्तीय टूलकिट्सची सखोल माहिती, आर्थिक आरोग्याचे विश्लेषण आणि अंदाज करण्यासाठी सखोल प्रशिक्षण आणि बँकिंग आणि वित्तच्या मूलभूत गोष्टी आदींचा समावेश असेल. बँकिंग तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण आयआयटी मद्रासने दिलेल्या एका निवेदनात असं म्हटलं आहे की, आघाडीच्या बँकांमध्ये दोन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे माजी उपाध्यक्ष डॉ. बालाजी अय्यर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नेतृत्व करतील. प्रशिक्षणासाठी बँकिंग तज्ज्ञांच्या एका गटासह ते काम करतील. आयआयटी मद्रासने म्हटलं आहे की आपला देश ५ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने घोडदौड करीत असताना अशा प्रकारचे वित्तीय क्षेत्रासाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IrEvRpb
via IFTTT

Post a Comment

0 Comments