Lata Mangeshkar यांच्याकडे जगातील ६ विद्यापीठांच्या मानद पदवी, शालेय शिक्षणाबद्दल जाणून घ्या

Education: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ९२ वर्षीय लता मंगेशकर यांनी सकाळी ८.१२ वाजता अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने केवळ सिनेविश्वातच नाही तर भारतातील सर्वसामान्यांपासून ते विशेषापर्यंत सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लता मंगेशकर यांनी शालेय शिक्षण घेतलेले नाही. असे असले तरी त्यांना जगातील ६ विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. आपल्याकडे असलेले कौशल्य,प्रतिभा आणि त्याला मेहनत, सातत्याची जोड असेल तर जागितल स्तरावर देखील दखल घेतली जाऊ शकते याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. लता मंगेशकर यांना पाच भावंडं आहेत आणि दीदी त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांच्या बहिणींचे नाव आशा, मीना, उषा आणि भावाचे नाव हृदयनाथ मंगेशकर आहे. लता दीदींच्या आयुष्यातील कथा खूप रंजक आहेत. इतर मुलांप्रमाणे लता दीदीही शाळेत शिकण्यासाठी गेल्या पण एका घटनेनंतर त्यांना पुन्हा शाळेत जाणे बंद करावे लागले. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर येथील प्रसिद्ध संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. लता मंगेशकर यांच्या वडिलांचे १९४२ मध्ये निधन झाले. यावेळी त्या १३ वर्षांच्या होत्या आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. लता मंगेशकर या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होत्या. घरातील एकमेव कमावणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांनी कुटुंबाची काळजी घेतली. लता दीदींनी एक अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर एक उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांनी ओळख बनविली. लता मंगेशकर कधी शाळेत का गेल्या नाहीत? याचीही एक कथा आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी लता मंगेशकर मुलांना गाणे शिकवत होत्या आणि जेव्हा शिक्षकांनी त्यांना असे करण्यापासून रोखले, तेव्हा त्या कधीच शाळेत गेल्या नाहीत. लता मंगेशकर कधी-कधी त्यांची धाकटी बहीण आशा भोसले यांना शाळेत घेऊन जात. आणि त्याला परवानगी नव्हती. त्यांना आपल्या बहिणीला सोबत शाळेत नेण्याची परवानगी नव्हती. दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी शाळा सोडली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या शाळेत न जाण्याचे कारण काहीही असले तरी त्यांनी जागतिक विद्यापीठातून सर्वाधिक पदव्या मिळविण्याचा सन्मान मिळविला. सूरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जगातील सहा विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांच्या नावावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची नोंद आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CknzQp1
via IFTTT

Post a Comment

0 Comments