Also visit www.atgnews.com
राज्यात तीन लाख नव्या रोजगारसंधी; कुठे आहेत हे रोजगार... जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई राज्यात करोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढत राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र २'वर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी राज्यातील उद्योग घटकांसमवेत ९८ गुंतवणूक करार करण्यात आले. राज्यात त्यातून १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी (job opprtunities) निर्माण होतील, असा अंदाज अजित पवार () यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९ हजार ६२१ प्रस्ताव मंजूर केले असून त्याद्वारे १ हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी ३० हजारांहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले. महिलांसाठी विशेष योजना राज्यात महिलांना उद्योगाची प्रेरणा मिळावी, यासाठी पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दीवर्षाचे औचित्य साधून 'पंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना' जाहीर करण्यात आली आहे. करोनामुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. आदिवासी औद्योगिक क्लस्टर आदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी जाहीर केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LNMt2Iv
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments