Also visit www.atgnews.com
वैद्यकीय शिक्षण देशातच पूर्ण करू द्या; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुप्रीम कोर्टात याचिका
युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना देशातच वैद्यकीय शिक्षण घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देऊन त्यांना ते शिक्षण येथेच पूर्ण करण्याची मुभा मिळावी यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. अॅडव्होकेट राणा संदीप बुस्सा यांच्यासह काही जणांनी ही याचिका केली आहे. या रिट याचिकेत असे म्हटले आहे की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत मिळालेल्या भारतीयांच्या जीवनाचे संरक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या मौल्यवान अधिकाराचे मुद्दे या रिट याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप परत आणून केंद्र सरकारने गौरवास्पद काम केले आहे. पण हे विद्यार्थी आपल्या शिक्षणासारख्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहात आहेत. म्हणून त्यांना देशातच पुढी शिक्षण पूर्ण करू द्यावे. 'सरकारने अतिशय प्रभावी कार्यवाही करत या विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या उर्वरित शिक्षणाविषयी अद्याप संदिग्धता आहे. भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रमात या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने काही उपाययोजना करायला हवी. यासाठी न्यायालयाने सरकारला निर्देश द्यावेत,' असे या याचिकेत नमूद केले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर मोदी सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधील हजारो भारतीयांना मायदेशी आणले. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. या विद्यार्थ्यांना उर्वरित शिक्षण भारतात पूर्ण करता यावे यासाठी यापूर्वीच अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kwaL1pz
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments