Also visit www.atgnews.com
इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षा ९ एप्रिलपासून ऑफलाइन पद्धतीने
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ऑनलाइन घेण्यावरून झालेल्या गदारोळानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही परीक्षा ऑफलाइन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार इंटरमिजीएट व एलिमेंटरी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक कला संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. इंटरमिजीएट व एलिमेंटरी या दोन्ही परीक्षा ९ ते १२ एप्रिलदरम्यान ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना १० मार्चपासून https://ift.tt/CVMWJTy आणि https://dge.doamh.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांकरिता तसेच, इयत्ता दहावी व मूलभूत किंवा कलाशिक्षक प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमीडिएट परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी केंद्राची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा शुल्क व परीक्षक, समालोचक, उपमुख्य समालोचक यांच्या अर्जाची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना १० ते २५ एप्रिलदरम्यान नव्याने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना १५ ते २५ मार्चदरम्यान ऑनलाइन पद्धतीनेच शुल्क भरायचे आहे. तसेच शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रासाठी ९ ते १५ मार्चदरम्यान तसेच परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचकांना २१ ते ३१ मार्चपर्यंत https://ift.tt/CVMWJTy आणि https://dge.doamh.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी ५० रुपये तर इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी प्रति विद्यार्थी १०० रुपये परीक्षा शुल्क आकारल्याची माहिती कला संचालनालयाचे कलासंचालक राजीव मिश्रा यांनी दिली. असे आहे वेळापत्रक एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ९ आणि १० एप्रिल रोजी होणार आहे. ९ एप्रिलला सकाळी १०.३० ते १ वाजता वस्तूचित्र आणि दुपारी २ ते ४ वाजता स्मरणचित्र या विषयांची परीक्षा होणार आहे. १० एप्रिलला संकल्पचित्र-नक्षीकाम या विषयाची परीक्षा सकाळी १०.३० ते १ वाजता आणि कर्तव्यभूमिती व अक्षर लेखन विषयाची परीक्षा दुपारी २ ते ४ दरम्यान होणार आहे. त्याचप्रमाणे इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा ही ११ व १२ एप्रिल रोजी होणार आहे. ११ एप्रिलला स्थिरचित्र विषयाची परीक्षा सकाळी १०.३० ते १.३० तर, स्मरणचित्र विषयाची परीक्षा दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान होणार आहे. १२ एप्रिलला संकल्पचित्र-नक्षीकाम या विषयाची परीक्षा १०.३० ते १.३० आणि कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन विषयाची परीक्षा २.३० ते ५.३० दरम्यान होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WHsjFhX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments