JEE Mains २०२२ परीक्षा देण्याआधी 'या' १५ शॉर्टफॉर्मचा अर्थ जाणून घ्या, NTA कडून यादी जाहीर

exam: बीई (BE), बीटेक (BTech), बीएआरसीएस (BArch), बीप्लानिंग (BPlanning) सारख्या इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा, संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Mains)चे आयोजन दोन सत्रांमध्ये केले जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (, ) कडून एप्रिल आणि मे २०२२ मध्ये जेईई मुख्य परीक्षा घेतली जाणार आहे. जेईई मेन्स २०२२ चे (JEE Main 2022) फॉर्म जाहीर झाले आहेत. या परिक्षेला बसलेल्या उमेदवारांना जेईई मेन २०२२ शी संबंधित काही महत्त्वाच्या चिन्हांचा अर्थ जाणून घेणे महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या सुरुवातीपासून ते इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश घेण्यापर्यंत उमेदवारांना याची मदत होणार आहे. एनटीएने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अपलोड केलेल्या माहिती बुलेटिनमध्ये जेईई मेन २०२२ बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये सर्व महत्त्वाचे संक्षेप आणि त्यांचे अर्थही सांगितले आहेत. अशाच १५ एब्रिवेशन (Abbreviations) बद्दल माहिती करुन घ्या. यामुळे तुम्हाला परीक्षेच्या नोंदणीपासून ते प्रवेश प्रक्रियेपर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार नाही. JEE Main Exam 2022: महत्वाचे अॅब्रिवेशन्स CoA - काऊन्सिल ऑफ आर्किटेक्टर MoE - मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन DASA - डायरेक्ट अॅडमिशन फॉर स्टुडन्ट अॅब्रॉड CFTI - सेंट्रली फंडेड टेक्निकल इंस्टिट्यूट UFM - अनफेयर मीन्स RPwD – राइट्स ऑफ पर्सन विद डिसॅबिलीटीज QRS - क्वेरी रिड्रेसल सिस्टिम QP - क्वेश्चन पेपर CSAB - सेंट्रल सीट अलॉकेशन बोर्ड JoSAA - जॉइंट सीट अलॉकेशन अथॉरिटी AICTE - ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन NEP - नॅशनल एज्युकेश पॉलिसी TPC - टेस्ट प्रॅक्टिस सेंटर EWS – इकॉनॉमिक वीकर सेक्शन FAQ - फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन एनटीए जेईई मेन २०२२ एप्रिल आणि मे या दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन २०२२ फेज १ ही १६ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित केली जाईल तर जेईई मेन २०२२ फेज ही २४ ते २९ मे दरम्यान आयोजित केली जाणार आहे. महत्वाच्या तारखा जेईई मेन २०२२ नोंदणीची सुरुवात - १ मार्च २०२२ जेईई मेन २०२२ साठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख - ३१ मार्च २०२२ जेईई मुख्य परीक्षेची तारीख २०२२ सत्र 1१– १६,१७,१८,१९, २० आणि २१ एप्रिल २०२२ सत्र २ – २४,२५,२६,२७,२८ आणि २९ मे २०२२ जेईई मेन परीक्षा २०२२ च्या वेळापत्रकासोबतच एनटीएने जेईई मेन २०२२ ची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरु केली आहे. जेईई मेन २०२२ परीक्षेच्या एक किंवा सर्व सत्रांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार, एनटीए जेईई मेन्स २०२२ (NTA JEE Mains 2022) फक्त दोनदा घेण्यात येणार आहे. एनटीए मध्ये बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतिम मुदतीपूर्वी जेईई अर्ज फॉर्म २०२२ सबमिट करणे आवश्यक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Aj3ldWt
via IFTTT

Post a Comment

0 Comments