Also visit www.atgnews.com
NEET UG Counseling: प्रवेश घेताना मायग्रेशन सर्टिफिकेटची आवश्यकता नाही
2021: नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१-२२ मध्ये उपस्थित देशभरातील उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने (,MCC) सध्या सुरू असलेल्या नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ (NEET UG Counselling 2021)संदर्भात महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. समितीने ५ मार्च २०२२ रोजी जाहीर केलेल्या नोटीसनुसार, वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील (Medical and Dental College) यूजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मायग्रेशन सर्टिफिकेटची () आवश्यकता नाही. एमसीसीच्या सूचनेनुसार, यापुढे उमेदवारांना पदवीसाठी सादर करणे बंधनकारक राहणार नाही. देशातील अनेक उमेदवारांना महाविद्यालयांमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेटच्या मागणीमुळे प्रवेश घेण्यात अडचण येत असते. त्यातून सवलत देण्याची मागणी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे केली जात होती. तात्पुरता प्रवेश मेडिकल काऊन्सेलिंग कमेटीने मायग्रेशन सर्टिफिकेटबाबत दिलेल्या नियमांमध्ये उमेदवारांना तात्पुरता दिलासा दिला आहे. देशभरातील महाविद्यालयांनी मायग्रेशन सर्टिफिकेट नसेल तर उमेदवारांना प्रवेश नाकारू नये आणि त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जास्तीत जास्त ७ दिवसांचा कालावधी देऊन त्यांना तात्पुरता प्रवेश द्यावा, अशी सूचना एमसीसीने केली आहे. मायग्रेशन सर्टिफिकेटशिवायही नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ अंतर्गत वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देऊन तात्पुरता प्रवेश घेतला जाऊ शकतो. १० मार्चपासून मॉप-अप फेरी नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ साठी एमसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, काऊन्सेलिंगच्या दोन फेऱ्यांची प्रक्रिया २७ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर मॉप-अप फेरी आयोजित करण्यात आली. या फेरीसाठी कॉलेजांना ८ आणि ९ मार्चपर्यंत सीट मॅट्रिक्सची पडताळणी करावी लागणार आहे. उमेदवार १० ते १४ मार्च २०२२ या कालावधीत या फेरीसाठी ऑनलाइन नोंदणी करू शकतील. उमेदवारांना त्यांची सीट चॉईस फिलिंग आणि चॉइस लॉकिंग देखील या तारखांपर्यंतच करावी लागेल. या फेरीचे नीट यूजी काऊन्सेलिंग २०२१ चे निकाल १९ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहेत आणि उमेदवार मायग्रेशन सर्टिफिकेटशिवाय २० ते २७ मार्च २०२२ पर्यंत वाटप केलेल्या महाविद्यालयात अहवाल देऊ शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1Zy7SQ5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments