सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'पीएचडी'साठी बाह्यमार्गदर्शक

प्राध्यापक भरती बंद असल्याने, पुणे विद्यापीठात प्राध्यापक आणि मार्गदर्शकांची उणीव भासत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडी मार्गदर्शक पुरेशा संख्येत नसल्याने, त्यांना संशोधन करण्यात अडचणी येत आहेत. या अडचणींचा विचार करून बाह्य मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यासाठी विद्यापीठाने समिती नियुक्त केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींनुसार विद्यापीठ प्रशासनाने बाह्य मार्गदर्शक नियुक्तीबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/P8RSUFH
via IFTTT

Post a Comment

0 Comments