MPSC विद्यार्थ्यांमध्ये दोन गट, अलका चौकात आंदोलन करत केली 'ही' मागणी

MPSC Exam: राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला होता. या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली. घटनात्मक संस्था असलेल्या एमपीएससीने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. 'स्वायत्त आयोग आमचा आधार' असे फलक घेऊन परीक्षार्थी आंदोलनाला रस्त्यावर बसले आहेत. एमपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे स्पर्धा परीक्षार्थींचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JHzOnQY
via IFTTT

Post a Comment

0 Comments