विद्यापीठ क्रीडा संकुलासाठी ४४ कोटींचा निधी

Nagpur University:विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढावा यासाठी विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा संकुलाचा प्रस्ताव तयार केला होता. क्रीडा संकुलात ऑलिम्पिकस्तरीय सुविधा खेळाडूंना प्रदान केल्या जातील. बास्केटबॉल, बॅडमिंटन, जिमनॅस्टिक यासह विविध खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा क्रीडा संकुलात राहतील. विद्यापीठ प्रशासनाच्या प्रस्तावाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पडताळणी करण्यात आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FX3CnJv
via IFTTT

Post a Comment

0 Comments