उष्मा वाढल्याने अन्य बोर्डाच्या शाळांनाही सुट्टी द्या, पालकांकडून होतेय मागणी

School Holiday:राज्य सरकारच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा परीक्षा संपल्यानंतर एप्रिल, मे महिन्यात सुट्टीसाठी बंद असतात. गेल्या काही वर्षांपासून मार्च, एप्रिल महिन्यात उष्णतेची तीव्रता वाढत आहे. बहुतांश शहरांमध्ये ४० अंशाच्या वर तापमान आहे. ठाण्यात एप्रिल महिन्यात ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा एप्रिल महिना संपेपर्यंत चालू असतात. काही शाळांमध्ये पंखेदेखील नादुरुस्त असतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xM9R5Lt
via IFTTT

Post a Comment

0 Comments