सीएस परीक्षेचा निकाल जाहीर

नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर केला आहे. ही व्यावसायिक परीक्षा डिसेंबर २०१९ मध्ये घेण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांना निकाल पाहायचा आहे ते आयसीएसआयच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून निकाल पाहू शकतील. .examresults.net येथे क्लिक करून निकाल पाहता येईल आणि गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल. विद्यार्थ्याचे विषयनिहाय गुणदेखील संकेतस्थळावर उपलब्ध असतील. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ISCI) ने CS फाउंडेशनच्या डिसेंबर २०१९ परीक्षेचा निकाल २५ जानेवारी २०२० रोजी जाहीर केला होता. कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाच्या एक्झिक्युडिव परीक्षेचा निकालही मंगळवारी २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32mWpSq
via IFTTT

Post a Comment

0 Comments