सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक येथे पाहा

नवी दिल्ली. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा येत्या शनिवारपासून १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सीबीएसईने जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दोन्ही वर्गांतील विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत आहे. तथापि, त्यापूर्वी सकाळी १० ते रात्री १०:१५ या वेळेत परीक्षार्थिंना प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. तर, सकाळी १०.१५ ते १०:३० दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित केल्या जातील. दहा वाजण्यापूर्वीच परीक्षार्थिंनी परीक्षा हॉलमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा शनिवार १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई दहावीचा शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र असून तो १८ मार्चला आहे. बारावीचा शेवटचा पेपर सोशलॉजी विषयाचा असून तो ३० मार्चला आहे. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अॅडमिट कार्ड (हॉल तिकीट) देण्यात आले आहेत. त्यांनी अधिक परीक्षेसंदर्भातली अधिक माहितीसाठी शाळांना संपर्क करण्याचे आवाहन बोर्डाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38jKfMj
via IFTTT

Post a Comment

0 Comments