Also visit www.atgnews.com
शिक्षकांच्या पदांची थेट भरती; घसघशीत पगार

मुंबई: शिक्षकांच्या विविध प्रकारच्या पदांची भरती गोव्यात होणार आहे. गोवा पब्लिक सर्व्हिस कमिशन (गोवा लोकसेवा आयोग) ही भरती करणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२० आहे. काय आहे शैक्षणिक पात्रता? असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसरसह विविध पदांवर अर्ज मागवण्यात आले आहेत. शैक्षणिक योग्यता पदांनुसार वेगवेगळी आहे. असोसिएट प्रोफेसर पदासाठी सुपर स्पेशालिटीसह पदव्युत्तर पदवी आणि कामाचा किमान चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. नोकरीचं ठिकाण गोवा असणार आहे. कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. गोवा लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतंही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. या पदांवरील निवड मुलाखतीच्या आधारे होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गोवा लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. अधिक माहितीसाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uO6aNm
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments