विद्यापीठांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लवकरच वर्क फ्रॉम होम

राज्यात कोरोना विषाणू (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपत्कालीन परिस्थिती वगळता प्राध्यापकांना 'वर्क फॉर्म होम'ची परवानगी देण्यात आली आहे. याचप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही परिस्थितीनुसार अशी परवानगी देण्याबाबत शासन निर्णय घेईल. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनात भीती किंवा गैरसमज बाळगू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सामंत म्हणाले, विद्यापीठे, महाविद्यालये बंद असले तरी विद्यापीठाचे कुलगुरु, उपकुलगुरु, कुलसचिव, उपकुलसचिव तसेच महाविद्यालये/तंत्रनिकेतनचे प्राचार्य/संचालक/अधिष्ठाता, यांनी नियमितरित्या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असल्याने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक असते. परंतु शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आणि गैरसमज करुन घेऊ नये. शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करुन आणि राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यासर्व परिस्थितीचा विचार करुन आवश्यकतेप्रमाणे प्राध्यापकांप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही वर्क फॉर्म होम निर्णय तातडीने घेण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33vLarp
via IFTTT

Post a Comment

0 Comments