Also visit www.atgnews.com
करोना: वायुसैनिकांची ऑनलाइन परीक्षा लांबणीवर
मुंबई: केंद्रीय वायूसैनिक भरती मंडळ (Central Airmen Selection Board) ने वायूसैनिकांची ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली. विषाणूच्या देशातील फैलावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने कळवले आहे. देशभरातील ८६ शहरात १९ ते २३ मार्च दरम्यान ही परीक्षा होणार होती. आता ही परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होऊ शकेल, असे हवाईदल जनसंपर्क विभागाने कळवले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी https://ift.tt/2kkU091 या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल. सेंट्रल एअरमेन सिलेक्शन बोर्डाने परिपत्रकात असे म्हटले आहे की करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर STAR 01/20 ऑटोमेटेड ई-परीक्षा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १९ ते २३ मार्च २०२० या दरम्यान होणार होती. मात्र अनेक राज्य सरकारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी कलम १४४ लागू केले आहे. ही परीक्षा एप्रिल २०२० च्या शेवटच्या आठवड्यात घेतली जाऊ शकते.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39ZEDrh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments