Also visit www.atgnews.com
दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून राज्यभरात सुरू होत आहे. या परीक्षेला एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी ९,७५,८९४ विद्यार्थी तर ७,८९,८९४ विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात एकूण ४,९७९ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. दहावीची परीक्षा २३ मार्च २०२० पर्यंत चालणार आहे. राज्यभरात एकूण ९,०४५ दिव्यांग विद्यार्थी यंदा दहावीची परीक्षा देत आहेत. त्यांना नियमानुसार सवलती दिल्या जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचे हेल्पलाइन क्रमांकही बोर्डाने जारी केले आहेत. हेल्पलाइन क्रमांक - पुणे - ९४२३०४२६२७मुंबई - (०२०) २७८८१०७५ / २७८९३७५६नागपूर - (०७१२) २५६५४०३ / २५५३४०१औरंगाबाद - (०२४०) २३३४२२८ / २३३४२८४ / २३३१११६कोल्हापूर - (०२३१) २६९६१०१ / २६९६१०२ / २६९६१०३अमरावती - (०७२१) २६६२६०८नाशिक - (०२५३) २५९२१४१ / २५९२१४३लातूर - (०२३८२) - २५१६३३कोकण - (०२३५२) - २२८४८०
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ThKaUx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments